Bribe
BribeSaam tv

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बिलासाठी घेतली ५० लाखांची लाच; ३ अधिकारी गाेत्यात

विदर्भात नजीकच्या इतिहासात एवढ्या मोठ्या रकमेचे हे पहिलेच लाच प्रकरण आहे.
Published on

चंद्रपूरात : नागपूर एसीबीने (ACB) चंद्रपूर (chandrapur) आणि नागपुर (nagpur) येथून तीन अधिका-यांना ५० लाखांच्या लाच (bribe) प्रकरणात अटक (arrest) केली आहे. तक्रारदाराकडे मृद व जलसंधारण कार्यालयात केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी ८१ लाख रुपये लाच मागितली हाेती. त्यातील ५० लाख घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. (chandrapur latest marathi news)

एसीबीने दिलेल्या माहितीनूसार कविजीत पाटील (वय ३२, जिल्हा जलसंधारण अधिकारी, नागपूर तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी) , श्रावण शेंडे (वय ४६, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी, वर्ग-१ मृद व जलसंधारण कार्यालय जि. चंद्रपूर) आणि रोहित गौतम (वय ३५ , विभागीय लेखाधिकारी, वर्ग-१ मृद व जलसंधारण  कार्यालय, जि. चंद्रपूर) अशी लाच मागणा-या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Bribe
Gunaratna Sadavarte: मराठा समाजाचा अवमान; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

या तिन्ही अधिका-यांनी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाच्या केलेल्या कामाच्या बिलाची व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता तक्रारदारास ८१ लाखांची लाच मागितली होती. त्यातून ५० लाख देण्याची तडजाेड झाली. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीत प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांनी तिघांच्या वतीने लाचेची रक्कम घेतली. सध्या ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींवर गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Bribe
Leopard: दिल्ली मोहल्ला परिसरातील घरात शिरला बिबट्या; महिला ठार
Bribe
Gadchiroli: नक्षल्यांचा पाेलीसांवर अचानाक गाेळीबार; 'सी- ६० कमांडाे' जखमी
Bribe
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com