File Photo
File PhotoSaam Tv

Aurangabad News : उंदरांचा प्रताप, विद्यार्थ्याच्या डोक्याला ताप; परीक्षेच्या पाचव्या दिवशीही गोंधळ कायम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत सलग पाचव्या दिवशीही गोंधळ उडाला आहे.
Published on

औरंगाबाद : उंदराने झेरॉक्स मशीनची केबल खाल्ल्याने दोन्ही सत्रांच्या परीक्षेला दोन तासांचा उशीर झाल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत सलग पाचव्या दिवशीही गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ मानवनिर्मित नव्हता तर उंदराने निर्माण केला होता. उंदराच्या प्रतापाने विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप झाल्याचा प्रत्यय समोर आला आहे. (Latest Marathi News)

File Photo
Mumbai News : मुंबईकरांना वीज दरवाढीचा 'शॉक'? पुढील महिन्यापासून वीजबिलात वाढ होण्याची शक्यता

औरंगाबाद (Aurangabad) शहरातील भडकल गेटच्या रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्समधील झेरॉक्सची केबलच उंदराने खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अडीज किमी अंतरावरील मौलाना आझाद कॉलेजमधून प्रश्नपत्रिकांसाठी प्रिंट आणाव्या लागल्या. यामुळे सकाळच्या सत्रात दीड ते दोन तासांचा उशीर झाला.

त्याचबरोबर दुपारचा पेपरही दोन तास उशिराने सुरू झाला. दोन्ही सत्रांतील एमए, एमएस्सीच्या १६०५ विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत (Exam) सलग पाचव्या दिवशीही गोंधळ कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.

File Photo
Pune News: तरुणीवर ब्लॅकमेल करत तब्बल आठ वर्ष अत्याचार; पीडितेने हिंमत दाखवत उचललं मोठं पाऊल

हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उडाला होता गोंधळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ओळखपत्रावरून परीक्षा केंद्रात प्रवेश घेत परीक्षा द्यावी लागली होती. विद्यापीठाच्या परीक्षेत सातत्याने गोंधळ समोर येत आहे. त्यामुळे सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

दरम्यान, हॉलतिकीट न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आम्ही हॉलतिकीट परीक्षेच्या एक दिवस अगोदरच महाविद्यालयांना पाठवले. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले नाही, असे त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com