Mumbai News : मुंबईकरांना वीज दरवाढीचा 'शॉक'? पुढील महिन्यापासून वीजबिलात वाढ होण्याची शक्यता

अदानी आणि टाटा पॉवरने दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
power generation
power generation Saam TV
Published On

Mumbai News: आधीच महागाईने त्रस्त मुबंईकरांना आणखी एक झटक बसण्याची शक्यता आहे. मुंबईत वीज दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या अदानी आणि टाटा पॉवरने वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.

अदानी आणि टाटा पॉवरने दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांच्या खिशाला फटका बसू शकतो. अदानी कंपनीने घरगुती ग्राहकांच्या वीजदरात सरासरी एक टक्क्याची वाढ प्रस्तावित केली आहे. तर टाटा पॉवरने दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. (Mumbai News)

power generation
Pune News: 'तुला संपवतोच...', पुण्यात मनसे नेत्यावर गोळीबाराच्या घटनेने खळबळ

पुढील महिन्यातील सुनावणीनंतर प्रस्ताव मान्य झाल्यास मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल. तर एप्रिल महिन्यापासून वाढीव दरानुसार पैसे आकारले जातील. त्यामुळे पुढील महिन्यातील सुनावणीकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

power generation
Viral Video : मेरा पिया घर आया... नवरदेवाला पाहताच नवरीचा आनंद गगनात मावेना; बेभान डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

किती बिल वाढणार?

वीज दरवाढ लागू झाल्यास मुंबईकरांच्या बिलात किती वाढ होईल हे समजून घेऊयात. सध्या घरगुती ग्राहकांचं बिल ५०० रुपये येत असेल तर नव्या दरांनुसार बिलात ५० रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजे नव्याने येणारं बिल ५०० रुपयांऐवजी ५५० रुपये असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com