Pune News: 'तुला संपवतोच...', पुण्यात मनसे नेत्यावर गोळीबाराच्या घटनेने खळबळ

मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.
Samir Thigle
Samir ThigleSaam TV

Pune News: पुण्यातील राजगुरुनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसेच्या पुण्यातील नेत्यावर धमकावत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे आपल्या राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील घरासमोर असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे कुटुंबिय देखील त्यांच्यासोबत होत.मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय तुलाही माज आला आहे. तुला संपवतोच असं म्हणत पिस्तुल रोखून आरोपीने समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली.

Samir Thigle
Abu Asim Azmi: अबु आझमींना जीवे मारण्याची धमकी, औरंगजेबला पाठिंबा दिल्यानं फोनवरून शिवीगाळ

आरोपीवर मोक्का आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे. आरोपींकडून खंडणीची मागणी करत पिस्तुल रोखत फायरिंग केली. छातीवर फायरिंग वेळी पिस्तुल न चालण्याने अनर्थ टळला. तर दुसरा गोळी हवेत फायर करण्यात आली आहे.

Samir Thigle
Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ? क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

घटनेनंतर राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणघातक हल्ला करत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com