Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ? क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत WFI चे सुरू असलेले उपक्रम तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.
Wrestler
Wrestler Saam TV

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील भांडणात क्रीडा मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावत कारवाई करताना दिसत आहे. सलग चार दिवस क्रीडा मंत्रालय संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. शनिवारी क्रीडा मंत्रालयाने दोन मोठे निर्णय घेतले. संध्याकाळी WFI सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत WFI चे सुरू असलेले उपक्रम तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.

क्रीडा मंत्रालय सातत्याने कुस्ती महासंघावर आपली पकड घट्ट करताना दिसत आहे. ही कारवाई आगामी काळात WFI अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढवण्याचे संकेत देत असल्याचे मानले जात आहे. एक दिवस आधीच मंत्रालयाने महासंघाला विशेष सूचनाही दिल्या होत्या. (Sports News)

Wrestler
Crime News : चुकीच्या उपचारांमुळे तरुणीचा गर्भपात, मग डॉक्टरने जे केलं ते वाचून चक्रावून जाल

सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मेरी कोम आणि योगेश्वर दत्त यांच्यासह सात सदस्यीय समितीची स्थापना केली. आंदोलक कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयओएकडे चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती

Wrestler
Abu Asim Azmi: अबु आझमींना जीवे मारण्याची धमकी, औरंगजेबला पाठिंबा दिल्यानं फोनवरून शिवीगाळ

दिल्लीच्या जंतरमंतरवर 18 जानेवारी रोजी विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना शिवीगाळ करून त्रास दिला जातो. हे सर्व आरोप कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंग, प्रशिक्षक आणि पंच यांच्यावर लावण्यात आले होते. या प्रकरणी बुधवारीच क्रीडा मंत्रालयाने WFI ला ७२ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com