कोव्हिड सेंटरमधून पळालेला कैदी अखेर सापडला; नालासोपाऱ्यातून केली अटक

नालासोपारा येथे लपून बसलेल्या मारुती दगडे याला आज पहाटे स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली. फरार आरोपी दगडे याचा शोध स्थानिक गुन्हे विभाग गेले अनेक दिवस घेत होते.
कोव्हिड सेंटरमधून पळालेला कैदी अखेर सापडला; नालासोपाऱ्यातून केली अटक
कोव्हिड सेंटरमधून पळालेला कैदी अखेर सापडला; नालासोपाऱ्यातून केली अटकराजेश भोस्तेकर, रायगड
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड : अलिबाग (Alubaug) नेहुली क्रीडा संकुलमध्ये कोरोना (corona) उपचारादरम्यान 21 जुलै रोजी फरार झालेला कैदी (prisoner) मारुती दगडे याच्या अलिबाग स्थानिक गुन्हे पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. नालासोपारा (nalasopara) येथे लपून बसलेल्या मारुती दगडे याला आज पहाटे स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली. फरार आरोपी दगडे याचा शोध स्थानिक गुन्हे विभाग गेले अनेक दिवस घेत होते. अखेर त्यांना यश आले आहे. (The prisoner who escaped from the Covid Center was finally found; Arrested from Nalasopara)

हे देखील पहा -

अलिबाग जिल्हा कारागृहातील कैद्यांची 5 जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 69 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. यामध्ये पोस्को अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेला मारुती दगडे यालाही कोरोना लागण झाली होती. या सर्व कैद्यांना अलिबाग तालुक्यातील नेहुली क्रीडा संकुल येथे तयार करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. 21 जुलै रोजी दगडे याने सगळ्याची नजर चुकवून कोव्हिड सेंटरच्या खिडकीची गज कापून मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पलायन केले. त्यानंतर मारुती दगडे याचा शोध अलिबाग पोलिसांकडून सुरू होता.

स्थानिक गुन्हे शाखेतील उप पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोह स्वप्नील येरुणकर, पोह सचिन शेलार, पोह. देवा कोरम, पोशि. अक्षय सावंत यांचे पथकाला आरोपी दगडे हा जेजुरी जि. पुणे परिसरातील डोंगराळ भागात लपून बसला असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने दोन दिवस जेजुरी, सासवड, फलटण भागात आरोपी याचा शोध घेतला तेथूनही तो निसटला होता.

कोव्हिड सेंटरमधून पळालेला कैदी अखेर सापडला; नालासोपाऱ्यातून केली अटक
तालिबानची भिती; उडत्या विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यू

आरोपी हा निपाणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक येथे गेला असल्याचे पथकाला समजले. आरोपी मारुती दगडे हा धनगर समाजातील असल्याने तो निपाणी येथे बाळुमामाची मेंढरे याची पुजा करण्यासाठी गेला असल्याचे सदर पथकास समजले. पथकाने निपाणी येथे जाऊन वेषांतर करुन धनगर लोकांसोबत राहुन आरोपी दगडे याची माहिती प्राप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा नालासोपारा येथे लपून बसला असल्याचे समजले. त्यानुसार स.पो.नि. धनंजय पोरे व त्यांच्या तपास पथकाने आरोपी दगडे याचा नालासोपारा तुळिंज परिसरात शोध घेऊन त्याला आज 16 ऑगस्ट रोजी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com