तालिबानची भिती; उडत्या विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यू

अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेजण एका विमानाच्या चाकांना लटकलेली होते.
तालिबानची भिती; उडत्या विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यू
तालिबानची भिती; उडत्या विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यूtwitter/@AsvakaNews
Published On

काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये प्रचंड भितीचं (Fear of Taliban) वातावरण आहे. काहीही करुन लोकांना तिथून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी लोकं वाटेल ते करतायत. अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोघांचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेजण एका विमानाच्या (Plane) चाकांना लटकलेली होते. विमामाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हे दोघेजण मोठ्या उंचीवरुन खाली पडले आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. (Fear of the Taliban; The two peoples who were hanging from the flying plane fell down and died)

हे देखील पहा -

अफगाणिस्तानची वृत्तसंस्था Asvaka News ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमेरिकन लष्कराचं (US Air Force) एक विमान टेक ऑफ करत असतानाच दोघेजण विमानाच्या टायर्सजवळ लटकले. मात्र विमान काही उंचीवर जाताच हे दोघेजण खाली पडले आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. दुसऱ्या एका व्हिडीओत अमेरिकन एअर फोर्सचे विमान धावपट्टीवर चालताना दिसत आहे आणि लोक त्या विमानाच्या मागे पळतायत तर काहीजण विमानावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. यावरुन तालिबानची लोकांमध्ये असलेली भिती स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच लोक जीवाची बाजी लावत अफगाणिस्तानातून पलायन करतायत.

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी (Ashraf Ghani) याअगोदरच आपल्या परिवारासह देशातून पलायन केलं आहे. तसेच अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काबुलमध्ये ५ हजार सैनिकांना तैनात केलं आहे. त्यामुळे काबुल येथील हमीद करजाई विमानतळ (Kabul Airport) सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. या विमानतळावरुन अमेरिकन एअर फोर्सच्या विमानांनी अमेरिका त्यांच्या नागरिकांना एअरलिफ्ट करणार आहे.

तालिबानची भिती; उडत्या विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यू
अफगाणिस्तानातील भारतीयांना रेस्क्यु करण्यासाठी एअर इंडीयाची विमानं तयार

भारतानेही (India) आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एअर इंडीयाची (Air India) दोन विमानं स्टँडबायवर ठेवली आहेत. मात्र काबुल एअरपोर्टवर गोळीबीर झाल्यानं सध्या तिकडे गोंधळ उडाला आहे त्यामुळे तिथे सर्व प्रकारची उड्डाणे रद्द करुन अमेरिकेने नो फ्लाईंग झोन घोषित (No Flying Zone) केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com