India Vs Pakistan Match: ठाणे येथील हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, भारत-पाक मॅच सुरू असताना टीव्ही फोडले; पाहा VIDEO

India Pakistan Asia Cup 2025: ठाणे येथील हॉटेल आणि बारमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भारत-पाक सामन्यादरम्यान टीव्ही फोडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Shiv Sena (UBT) workers vandalize hotel TVs in Thane during India-Pakistan Asia Cup final
Shiv Sena (UBT) workers vandalize hotel TVs in Thane during India-Pakistan Asia Cup final Saam Tv
Published On

ठाणे : भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या विरोधात घोडबंदर परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या) कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. घोडबंदर, ब्रह्मांड नाका, हिल टॉप हॉटेल बार आणि कॅलिफोर्निया हॉटेल बार येथील टीव्ही फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काल भारत–पाक फायनल सामना सुरु असताना हा प्रकार घडला. विभागप्रमुख प्रदीप यशवंत पूर्णेकर यांनी सामना सुरू होण्यापूर्वीच हॉटेल-बार मालकांना इशारा दिला होता की, भारत-पाक सामन्याचे प्रक्षेपण केल्यास प्रोजेक्टर आणि टीव्ही फोडण्यात येतील. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी सामना चालू असल्याचे दिसताच. टेबलवरील पाण्याचा जग हातात घेऊन समोर असलेले टीव्ही फोडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

Shiv Sena (UBT) workers vandalize hotel TVs in Thane during India-Pakistan Asia Cup final
Abrar Ahmed: अर्शदीप, जितेश आणि हर्षितने उडवली अबरारची खिल्ली; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

प्रदीप पूर्णेकर म्हणाले, पाकिस्तान वारंवार आपल्या देशावर हल्ले करतो आणि आपण त्यांच्यासोबत मैत्रीच्या नावाखाली सामने खेळतो, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही जे बोललो ते करून दाखवलं. या पुढेही असेच होईल.असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Shiv Sena (UBT) workers vandalize hotel TVs in Thane during India-Pakistan Asia Cup final
Suryakumar Yadav: सूर्या दादाने फक्त ५ शब्दात पाकिस्तानी पत्रकाराला धुतलं, एका नजरेत बोलती केली बंद, पाहा Video

या प्रकारामुळे ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडण्यात आली होती, त्याच पद्धतीने ‘शिवसेना स्टाईल’मध्ये हॉटेल-बार मालकांना समज दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर अखेर ऑपरेशन तिलक राबवत आशिया चषक आपल्या नावावर केला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने एकूण 146 धावा केल्या. भारतीय संघाने 147 धावांचे आव्हान पार करत आशिया कप 2025 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

हार्दिक पांड्याची अनुपस्थिती

दुखापतीमुळे भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुद्धच्या या निर्णायक सामन्यात खेळू शकला नाही. मांडीचे स्नायू ताणले गेल्याने त्याला या सामन्यात खेळता आले नाही. मात्र त्याच्या जागी रिकू सिंह हा मैदानात उतरला होता. मात्र त्याला फक्त शेवटचा चेंडू मिळाला त्यावर देखील त्याने चौकार मारत हा सामना जिंकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com