ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

Pradeep Purnekar Case: ठाण्याच्या प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश मिळालंय. रायगडमधील कर्नाळा जंगलातून हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल आणि आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय.
Pradeep Purnekar Case:
Pradeep Purnekar murder weapon recovered from Karnala forestsaam tv
Published On: 
Summary
  • ठाण्याच्या प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश

  • पूर्णेकर हत्या करण्यासाठी वापरलेलं पिस्तूल कर्नाळा जंगलातून जप्त

  • रायगडच्या कर्नाळा जंगलात पूर्णेकर हत्या प्रकरणातील पुरावा सापडला

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला तब्बल सहा दिवस उलटून गेलेत. आतापर्यंत फक्त 3 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी एसआयटीला मोठं यश मिळालंय. पुर्णेकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल पोलिसांनी जप्त केलंय. ⁠रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलातून ही पिस्तूल जप्त केली आहे. हत्या करुन आरोपींनी हत्यारे कर्नाळा जंगलात टाकली होती. ते पोलिसांना सापडली आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलात फेकलेलं हे पिस्तूल आणि आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय. एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव आणि विशेष तपास अधिकारी शैलेश साळवी यांच्या टीमनं हे पिस्तूल जप्त केलंय. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर सात राऊंड फायर करतानाच त्यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केले होते.

Pradeep Purnekar Case:
Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

या हत्या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले दोन प्रमुख आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा कट रचल्याचा संशय असलेला आरोपी सुभाष उर्फ पप्या शिंदे यालाही अटक करण्यात आलीय. आरोपी निखिल यादव आणि आरोपी नितेश पवार उर्फ भावड्या यांच्यावर हत्यारं लपवण्याची जबाबदारी होती.

Pradeep Purnekar Case:
Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

रायगडमध्ये सापडला पुरावा

हत्या केल्यानंतर आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली, अनोळखी हल्लेखोर, नितेश पवार उर्फ भावड्या आणि निखिल यादव हे अल्टो गाडीतून फरार झाले होते. ⁠कल्याण फाटा येथे आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या अल्टो गाडीतून उतरले. ⁠तिथून ते मुंबई-गोवा हायवेच्या दिशेने निघाले रस्त्यात त्यांनी कर्नाळा येथे हत्यारं लपवली.

⁠मात्र ते जास्त पुढे न जाता ते कर्नाळा येथे एका दुकानात थांबले त्यांच्या जवळचे पैसे संपल्याने त्यांना पुढे जाण्यापेक्षा कर्नाळा येथे ठिकाण बदलत थांबले. पण ठाणे क्राईम ब्रांचने तांत्रिक तपास करत आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या मुसक्या आवळल्या.

महिन्याआधी रचला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप पूर्णेकर यांचा खून करण्यासाठी आरोपींनी महिनाभर आधीच कट रचला होता. पूर्णेकर यांच्या हालचालींवर पाळत ठेवून रीतसर मॉक ड्रिलदेखील केले होते. ठाणे पोलिसांकडून आता मुख्य मारेकऱ्यांना अटक झाली असली, तरी अद्याप काही फरार आरोपींचा शोध सुरूय. ठाणे गुन्हेचं पथक खंडणी विरोधी पथकाच्या मदतीने या फरार आरोपींच्या मागावर आहेत. पोलीस फरार आरोपी संतोष कनोजिया आणि हेल्मेटधारी आरोपीला कधी पकडतील याकडे लक्ष लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com