दिल्लीत नीट पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांच्या एक महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. मात्र आतापर्यंत फुटलेल्या पेपर्समधील दोषींवर अजूनही कारवाई होत नसल्यानं संतापाची लाट पसरलीय. महाराष्ट्रात TET चा पेपर फुटून महिना उलटला तरी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्ता अद्यापही फरार आहे. भिवंडीतील एका नागरिकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या रॅकेटचे धागेदोरे थेट आग्र्यातील मुद्रणालयापर्यंत पोहोचले. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक झालीय.
टीईटीच्या आधी नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने 13 आरोपींना अटक केली. त्यातले 9 आरोपी महाराष्ट्रातील आहेत. तर दुसरीकडे पेपरफुटीवरुन राज्यात राजकारणही जोरात सुरु आहे. राज्यातील सर्वात मोठा TET घोटाळा ठाकरेंच्या काळात झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
'राज्यातील सर्वात मोठा TET
घोटाळा ठाकरेंच्या काळात'
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
'ठाकरेंच्या काळात घोटाळा
झाला नाही, उघडकीस आला'
सुषमा अंधारे, उपनेत्या, ठाकरेसेना
दरम्यान, राज्य राखीव पोलीस दल (SRPF)गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची २ मे २०२६ रोजी झालेली लेखी परीक्षाही रद्द करण्यात आली होती. कारण परीक्षेत १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या पुस्तकातून जसेच्या तसे आल्याचा प्रकार समोर आला होता. तर दुसरीकडे महिना उलटूनही सरकारने टीईटीच्या नव्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. या कारणामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. या साऱ्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र पेपरफुटीचा अड्डा झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.