दरड दुर्घटनाग्रस्तांचे कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरते पुनर्वसन

या कंटेनर हाऊसमध्ये स्वयंपाक घर, स्वछता गृह, फॅन, विजेची सुविधा देण्यात आली आहे. एका कुटूंबासाठी लागणारी सर्व सुविधा या कंटेनर हाऊस मध्ये करण्यात आलेली आहे.
दरड दुर्घटना पीडितांचे कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरते पुनर्वसन
दरड दुर्घटना पीडितांचे कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरते पुनर्वसनराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : 22 जुलै रोजी अतिवृष्टीने महाड तालुक्यातील तळीये येथील जलनी माता डोंगराचा मातीचा ढिगारा कोसळून 32 घरे गाढली गेली. या दुर्घटनेत 85 जणांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 21 कुटूंब ही पूर्णतः बेघर झाली आहेत. या कुटूंबाच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून हिरानंदानी याच्या मार्फ़त 24 अत्याधुनिक अशी कंटेनर हाऊस तयार करण्यात आली आहेत.

हे देखील पहा -

या कंटेनर हाऊस मध्ये स्वयंपाक घर, स्वछता गृह, फॅन, विजेची सुविधा करण्यात आली आहे. एका कुटूंबासाठी लागणारी सर्व सुविधा या कंटेनर हाऊस मध्ये करण्यात आलेली आहे. तळीये गावातच मोकळ्या जागेवर ही सुविधा करण्यात आली आहे.

दरड दुर्घटना पीडितांचे कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरते पुनर्वसन
धक्कादायक! बीडमध्ये 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

तळीयेमध्ये सध्या 11 कंटेनर हाऊस बसविण्यात आले असून एकूण 24 हाऊस तयार केले जाणार आहेत. यामध्ये 21 कुटूंब राहणार असून उर्वरित तीन कंटेनर मध्ये ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी आणि पोस्ट ऑफिस बनविले जाणार आहे. अशी माहिती तळीये ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश म्हस्के यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तात्पुरती निवाऱ्याची सुविधा करण्यात आली असल्याने 11 तारखे पर्यत 24 कंटेनर हाऊस उभारले जाणार असून बेघर झालेले कुटूंब वास्तव्य करणार आहेत, असे म्हस्के यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com