बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या गर्भ पिशव्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. केवळ 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या, गर्भ पिशव्या काढण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सरकारी हॉस्पिटलपेक्षा, खाजगी हॉस्पिटलमध्ये आकडेवारी दुप्पट असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यानी दिली आहे.
हे देखील पहा -
यापूर्वी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले. तर आता पुन्हा एकदा मागील 15 महिन्यात, तब्बल 651 महिलांनी परवानगी घेऊन गर्भपिशव्या काढल्या आहेत. त्याचबरोबर खाजगी डॉक्टर आवश्यकता नसतानाही, गर्भपिशव्या काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे वैद्यकीय अहवालात निदर्शनास आले आहेत.
आतापर्यंत बीड जिल्हा रूग्णालयात कोरोना काळात केवळ 4 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर एकट्या बीड तालुक्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये तब्बल 189 गर्भपिशव्या काढण्यात आल्या आहेत. दरम्यान रुग्णाची तपासणी करूनच गर्भपिशव्या काढण्यासाठी परवानगी दिली जाते. तपासणीविना त्यांना परवानगी दिली जात नाही. तर गतवर्षीपेक्षा यंदाचा आकडा कमी असल्याचा दावा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.