Mumbai political: मुंबईत ठाकरे गटाला जबरदस्त धक्का, महत्त्वाच्या शिलेदाराने निवडणुकीपूर्वीच सोडली साथ

Tejaswi Ghosalkars Resignation News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला विभागप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Uddhav thackeray Latest News
Uddhav thackeray NewsSaam tv
Published On

मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या महिला विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेला तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या. यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसेच ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी आपला राजीनामा व्हॉट्सअॅपद्वारे विभागप्रमुखांकडे सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Uddhav thackeray Latest News
Ulhasnagar: वाट अडवली अन् डोक्यात राग गेला! भररस्त्यावर टोळक्यांकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार

आपल्या राजीनाम्यात, ' मी तेजस्वी घोसाळकर दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख आणि आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.' असं घोसाळकर यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

Uddhav thackeray Latest News
'मी तुला सेक्स टॉय गिफ्ट दिलं तर?' अभिनेत्रीने आपल्या लेकीला १६ व्या वर्षी नेमकं कोणतं गिफ्ट दिलं? | Gautami Kapoor

भाजप की शिंदे गट? कोणत्या पक्षात पक्षप्रवेश करणार?

राजीनाम्यानंतर तेजस्वी घोसाळकर नक्की कोणत्या पक्षात पक्षप्रवेश करणार? याकडे सर्वांचंच लक्ष आहे. दरम्यान, घोसाळकर या भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्या लवकरच नव्या राजकीय प्रवासाची घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav thackeray Latest News
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com