Teacher Fight Video : मास्तर तुम्हीसुद्धा? खुर्च्या हातात घेऊन शिक्षकांची 'फ्री स्टाईल' हाणामारी

Chhatrapati Sambhajinagar Teacher Fight Video : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे शिक्षक पतसंस्थेच्या बैठकीत शिक्षकांची 'फ्री स्टाईल' हाणामारी झाली. शिक्षकाच्या एका गटाने दुसऱ्या एका शिक्षकाला बेदम मारहाण केली.
 मास्तर तुम्हीसुद्धा? खुर्च्या हातात घेऊन शिक्षकांची 'फ्री स्टाईल' हाणामारी
Teacher Fight Video Saam, tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेचे शिक्षक पतसंस्थेच्या बैठकीत एकमेकांना जोरदार भिडण्याची घटना घडली आहे. शिक्षकाच्या एका गटाने खुर्च्या हातात घेऊन तोडफोड केल्याची बाब समोर आली आहे. एका गटाने दुसऱ्या गटाच्या शिक्षकाला जबर मारहाण केली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर शिक्षक कोणत्या पातळीवर पोहचले आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पतसंस्थेच्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या एका गटाने दुसऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षक पतसंस्थेचे संचालक गोविंद उगले यांच्यासह पाच जणांवर सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक पतसंस्थेमधल्या ही शिक्षकांची हाणामारी बघितल्यानंतर शिक्षक कसे बेजबाबदारपणे वागत आहेत हे समोर आलं आहे.

 मास्तर तुम्हीसुद्धा? खुर्च्या हातात घेऊन शिक्षकांची 'फ्री स्टाईल' हाणामारी
Crime News : साताऱ्यातील कराडमध्ये माणुसकीला काळिमा, अनाथ आश्रमाच्या नावावर वेश्या व्यवसाय; दोघांना बेड्या

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेत रविवारी बैठक होती. या बैठकीत चर्चा सुरू असताना वाद झाला. त्यानंतर काही शिक्षकांनी खुर्च्या उचलून मारामारी सुरू केली. यात पससंस्थेचीही तोडफोड झाली. यात भिमराव मुंढे हे शिक्षक जखमी झाले आहे.

 मास्तर तुम्हीसुद्धा? खुर्च्या हातात घेऊन शिक्षकांची 'फ्री स्टाईल' हाणामारी
Mumbai Crime News : ऐकावं ते नवलच! पोलिसांच्याच घरी टाकला डाका, दरोडेखोराने १३ पोलिसांची घरं फोडली

ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांविरुद्ध पालक आक्रमक

ठाणे शहरातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेच्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेमधील पंकजा राजे नामक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असल्याचा आरोप पालकांनी केली. तसेच या शिक्षिका विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचीही पालकांनी केला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी मनसे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एकत्र होत एकच गोंधळ घातला.

अविनाश जाधव यांनी शाळेचे विश्वस्तांना महिला शिक्षिका विरोधात आजपर्यंत कारवाई का केली नाही, यासाठी जाब विचारला. तसेच शिक्षिकेवर तात्काळ कारवाई करा अन्यथा ठाणेकर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होतील, असा इशारा दिला आहे. तसेच पालकांच्या वतीने नौपाडा पोलिस ठाण्यात महिला शिक्षिकेविरोधात तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com