सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पक़ड घट्ट, अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार, वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा

Sunetra Pawar Warning To NCP Leaders Full Speech: सुनेत्रा पवारांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आता पक्षावरील आपली पकड आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या वर्धापन दिनाला नेत्यांना काय कडक इशारा दिलाय...? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Sunetra Pawar addresses party leaders during NCP anniversary, asserting strong leadership and warning against internal interference.
Sunetra Pawar addresses party leaders during NCP anniversary, asserting strong leadership and warning against internal interference.saam tv
Published On

अजितदादांच्या निधनाला 4 महिने पूर्ण झाले... दादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली... त्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर आली... कधी राष्ट्रीय कार्यकारणीचा मुद्दा पुढे आला तर कधी पदांवरून नाराजीनाट्य रंगलं...अशातच दादांच्या निधनानंतरच्या पहिल्या वर्धापन दिनाला सुनेत्रा पवारांनी आपलाच शब्द पक्षात अंतिम असल्याचं ठासून सांगितलयं.... त्यामुळे सुनेत्रा वहिनी बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण पक्षासाठी अंतिम असणार आहे...सुनेत्रा पवारांनी पक्षातील नेत्यांना काय कडक इशारा दिलाय ते त्यांच्या तोंडून ऐकूयात..

दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीतले अनेक वाद समोर आले. तर काही नेत्यांमुळे पक्षाची मोठी बदनामीही झाल्याची प्रकरणंही समोर आली. त्यामुळे पक्षाची बदनामी सहन करणार नसल्याचा इशारा सुनेत्रा पवारांनी भरसभेत दिलाय... इतकचं काय तर पक्षात वर्षानुवर्षे पदांवर बसलेल्या मात्र पक्ष विस्तारात शून्य योगदान असणाऱ्या डुड्डाचार्च नेत्यांचेही त्यांनी चांगलेच कान टोचले.

आतापर्यंत संयमित भूमिका घेणाऱ्या सुनेत्रा वहिनींनी आता पक्षातली अंतर्गत गटबाजी आणि अनावश्यक हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी कंबर कसलीय. मात्र वर्षानुवर्षे पक्षात ठाण मांडून बसलेले सुनेत्रा पवारांच्या या कडक इशाऱ्यानंतर आपली 'ढवळाढवळ' बंद करून ताळ्यावर येतील का? याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com