सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? भोंदू खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; राजकीय वर्तुळात खळबळ

Sunetra Pawar Security Threat SIT Investigation Details: सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार SIT कडे दाखल. रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
Security concerns rise as complaint alleges threat to Sunetra Pawar; SIT begins verification.
Security concerns rise as complaint alleges threat to Sunetra Pawar; SIT begins verification.saam tv
Published On

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय...आणि हा धोका रूपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचं म्हटलं आहे. यामुळे खळबळ माजली असून तक्रारीत नेमकं काय म्हटलयं... बीडमध्ये एका व्यक्तीनं खरात प्रकरणाशी संबंधित एक तक्रार SITकडे दाखल केलीय.. या तक्रारीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याचं म्हटलयं...आता या तक्रारीची SIT कडून पडताळणी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

दरम्यान "सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासन पूर्ण काळजी घेईल," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय... खर तर भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत..अशोक खरातच्या ट्रस्टमध्ये चाकणकरांचा असलेला सहभाग आणि त्यानंतर त्यांना द्यावा लागलेला राजीनामा, या पार्श्वभूमीवर आता SIT या नवीन तक्रारीची पडताळणी कशी करते? या तक्रारीत काही तथ्य आहे की यामागे काही वेगळं राजकीय षडयंत्र आहे? हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com