ट्रम्पमुळे लोकांची दारू पिण्याची क्षमता वाढली; विखें पाटलांचं पुन्हा अजब विधान

Sujay Vikhe Patil Statement On Donald Trump And Nagar Manmad Highway: ट्रम्पमुळे नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केला. तसेच ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करत लोकांच्या दारू पिण्याच्या क्षमतेबाबत मिश्कील टिप्पणी केली.
SUJAY VIKHE PATIL’S BIZARRE REMARK ON TRUMP
SUJAY VIKHE PATIL’S BIZARRE REMARK ON TRUMPsaam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारतातील क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्याचा थेट फटका नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला बसला असा दावा भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. शिर्डी येथे बोलताना विखे पाटील यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका करत काल केलेल्या विधानाचा पुरुच्चार केला.

SUJAY VIKHE PATIL’S BIZARRE REMARK ON TRUMP
Maharashtra Politics: गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते, बड्या राजकीय नेत्याचा दावा

मी अगोदरही बोललो आहे, असा वेडा माणूस देशाचे नेतृत्व करतो? असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला. इराणवरील हल्ल्यामुळे भारतातील क्रूड ऑइलचा पुरवठा बंद झाला किंवा त्यात मोठी घट झाली, असा दावा त्यांनी केला. क्रूड ऑइलच्या पुरवठ्यात सुमारे 50 टक्के घट झाल्याने पेट्रोल-डिझेल निर्मितीनंतर मिळणाऱ्या डंबराच्या उत्पादनावरही परिणाम झाला, असे ते म्हणाले. डांबरचा पुरवठा कमी झाल्याने नगर-मनमाड महामार्गाच्या कामावर परिणाम झाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. ही मोठी लिंक आहे आणि म्हणून याला ट्रम्प जबाबदार आहेत. असे ते म्हणाले. जो माणूस सकाळी एक आणि दुसऱ्या दिवशी एक बोलतो, कधी म्हणतो युद्ध संपलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मिसाईल टाकले जातात, अशी टीका त्यांनी केली.

SUJAY VIKHE PATIL’S BIZARRE REMARK ON TRUMP
Shocking : स्वातंत्र्यदिनी दुःखद घटना! ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान शिक्षकाचा मृत्यू; सांगलीत नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे भारतातील नागरिकांवरही वेगवेगळे परिणाम झाल्याचे सांगताना मिश्कील टिप्पणी केली. जे दारू पितात त्यांची दारू पिण्याची क्षमता वाढली. त्यांना कळेना हा वेडा काय म्हणतोय आणि काय नाही. मिसाईल पडली की ते पुन्हा प्यायला सुरू करतात, असे अजब विधान त्यांनी केले. सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com