Success Story: शेतकऱ्याची लेक, क्लास न लावता घरीच केला अभ्यास; माढ्याच्या दोन लेकी २३ व्या वर्षी बनल्या CA

Success Story Of CA Ankita Bhange And Dipti Kadam: सीए ही खूप अवघड परीक्षा आहे. माढ्यातील अंकिता आणि दिप्ती यांनी वयाच्या २३ व्या वर्षी सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

पंढरपूर - माढयातील अंकिता आनंद भांगे व दिप्ती विकास कदम या दोन्ही मुली वयाच्या २३ व्या वर्षी सीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या दोन्ही मुलांनी ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा अवलंब करत या परीक्षेत यश मिळवले आहे. कठीण असलेल्या सीएच्या परीक्षेत एकाच वेळी माढ्यातील दोन मुलींनी बाजी मारल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Success Story
Success Story: १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली, परीक्षेच्या आदल्या दिवशी १०३ ताप; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; IAS सौम्या शर्मा यांची कहाणी

माढयाचे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे यांची पुतणी व्यावसायिक आनंद भांगे व माढा नगरपंचायतीच्या गटनेत्या संजिवनी भांगे यांची कन्या अंकिता भांगे सीए च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठे यश प्राप्त केले आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलमध्ये झाले. तर अकरावी व बारावीचे वाणिज्य शाखेचे शाखेतील शिक्षण सोलापूर येथील हिराचंद नेमचंद महाविद्यालयात झाले. (Success Story OF CA)

सोलापूर येथील भारती विद्यापीठातून तिने वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच सीएच्या परीक्षेची तिने तयारी केली. दोन वर्षांच्या तयारीमध्ये तिने ही परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळविले आहे. अंकिता हिच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी माढयाहून थेट सोलापूर गाठले याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या व्यवसायावरती झाला तरी त्यांनी याबाबत विचार केला नाही. अंकिताच्या यशामागे कुटुंबाचेही योगदान आहे. (Success Story)

Success Story
Success Story: कॉलेजमध्ये नापास; एकदा नाही तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS अनुराग कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या दिप्ती विकास कदम हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सीएच्या परीक्षेत यश मिळवले असून तिचे प्राथमिक शिक्षण माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेत झाले. माढ्यातीलच कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बारावी वाणिज्य शाखेचे शिक्षण तिने घेतले व त्यानंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

कोणतेही क्लासेस न लावता केवळ ऑनलाइन पद्धतीमे अभ्यास करुन दिप्ती सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. तिला तिच्या कुटुंबीयांनी मोठे पाठबळ यासाठी दिले. दिप्तीच्या वडिलांचे उदरनिर्वाहाचे साधन केवळ शेती आहे. घरची प्रतिकूल परिस्थितीत असतानाही मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कर्ज काढले पण मुलीच्या शिक्षणात व्यत्यय येऊ दिला नाही. घराच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीची जाण राखत दिप्तीने मिळविलेल्या यशाने कुटुंबियांची मान उंचावली आहे.

Success Story
Success Story:३५ वेळा नापास, हरला नाही, जिद्दीच्या जोरावर दोनदा UPSC क्रॅक; IAS विजय वर्धन यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com