Success Story : अभिमानास्पद! नक्षलग्रस्त भागातील आदिवासी मुलींची यशाला गवसणी , ३ सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या पोलिस

Gadchiroli Sisters Success Story : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील तीन सख्ख्या बहिणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस भरतीत यश मिळवले आहे. त्यांच्या जिद्दीची ही प्रेरणादायी कथा अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
Success Story : अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकींची यशाला गवसणी, ३ सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या पोलिस
Gadchiroli Sisters Success StorySaam Tv
Published On
Summary
  • गडचिरोलीतील तीन बहिणींची पोलीस भरतीत निवड

  • प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवले यश

  • शेती करत शिक्षण आणि तयारी

  • वडिलांचा मोठा पाठिंबा

  • ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणा

गणेश शिंगाडे, गडचिरोली

एकीकडे मुली नको म्हणून त्यांची हत्या केली जाते. मात्र दुसरीकडे समाजात याच मुली आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करतात. एखादी गोष्ट मनावर घेतली की, करून दाखवायची ही जिद्द मनात बाळगून तीन बहिणींनी आपल्या कुटुंबाचं आणि गावाचं नाव मोठं केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी पोलीस भरतीत यश मिळवत इतिहास घडवला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्याजवळील खूणारा या छोट्याशा गावात अश्विनी, नूतन आणि पल्लवी कुमरे या तीन बहिणी राहतात. परिस्थिती हलाखीची मात्र शेती करून पोटाची भूक पूर्ण करायच्या. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अश्विनी, नूतन आणि पल्लवी या तिघी बहिणींची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे.

Success Story : अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकींची यशाला गवसणी, ३ सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या पोलिस
Shocking : लग्नाला नकार दिल्याने तरुणाचं भयंकर कृत्य, आधी जीभ कापली, नंतर गळा चिरून मुलीची हत्या

लहानपणापासूनच पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलेल्या या बहिणींनी अथक मेहनत घेत आज ते स्वप्न साकार केलं आहे. या यशामागे त्यांची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास तर आहेच, पण वडील श्यामलाल कुमरे यांचा पाठिंबा देखील तितकाच महत्त्वाचा ठरला. एकेकाळी नक्षलवादासाठी ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता सकारात्मक बदल अनुभवत आहे.

Success Story : अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकींची यशाला गवसणी, ३ सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या पोलिस
Crime News : "तू मला आवडतेस..." बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; ओढणी ओढली अन्...

येथील तरुण - तरुणी मोठ्या प्रमाणात पोलीस दलात सामील होताना दिसत आहेत.कुमरे बहिणींच्या या यशामुळे अनेक तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळत आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com