संगमनेरच्या शेतकऱ्याच्या मुलाने UPSC मध्ये ५२९ वा क्रमांक मिळवला
धनंजय दिघे यांनी तीन वर्षांच्या तयारीनंतर यश मिळवले
रोज सुमारे ९ तास अभ्यास करून त्यांनी UPSC उत्तीर्ण केली
मालेगाव तालुक्यातील चार विद्यार्थ्यांनीही UPSC निकालात यश मिळवले
सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Ahilyanagar Sangmner UPSC Dhananjay Dighe Success Story स्पर्धा परीक्षेत सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा काल निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावच्या शेतकऱ्याच्या मुलाने देशात ५२९ रँक घेऊन पास झाला आहे. या विद्यार्थ्यांचं नाव धनंजय दिघे असे आहे.
धनंजय यांचे आई वडील शेती करतात. त्यांनी २०२३ पासून अभ्यासाला सुरवात केली आणि अवघ्या तीन वर्षात यूपीएससी उत्तीर्ण झाले. यूपीएससीचा अभ्यास करताना नऊ तास त्यांनी अभ्यास केला. तसेच यूपीएससी बाबत सगळं मार्गदर्शन घेतले. धनंजय यांच्या आई-वडिलांना जेव्हा त्यांच्या यशाबद्दल कळालं तेव्हा त्यांना रडू कोसळले. धनंजय यांनी म्हटले की, आई-वडील जरी शेती करत असले तरी, मी कधीही शेतीत गेलो नाही. त्यांची इच्छा होती मी अधिकारीच व्हावे.
धनंजय यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल बोलताना म्हटले की, सिविल सर्विसेसमध्ये जाण्याची ओढ लहानपणापासूनच होती. निकाल लागला त्यावेळेस कळतच नव्हतं कसं रिऍक्ट करावं. सातवी आठवीला असल्यापासून मी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली. २०२४ ला सुरुवात केली आणि यावेळी तिन्ही परीक्षा पास झालो. रोज अभ्यास करून कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. इतर मुलं दहा-पंधरा पंधरा तास करत असले तरी मी नऊ तास अभ्यास करून यश मिळवल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेच्या निकालात मालेगाव तालुक्याने यंदा उल्लेखनीय यश मिळवले असून चार विद्यार्थ्यांनी देशपातळीवर यश मिळवत तालुक्याचा मान उंचावली आहे. सोयगावचा कार्तिक बच्छाव (१७७), पाटणेची धनश्री अहिरे (४८९), कळवाडीची प्रेरणा खवळे (९१३) आणि मालेगाव कॅम्पचा अनिकेत अहिरे (९४०) यांनी यश मिळवत मालेगावच्या शैक्षणिक क्षमतेची चमक देशभर दाखवून दिली आहे. सोयगाव येथील कार्तिक बच्छाव याने देशात १७७ वा क्रमांक मिळवत आयएएस पदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. पाटणे गावातील शेतकरी कुटुंबातील धनश्री अहिरे हिनेही जिद्दीच्या जोरावर यूपीएससीत ४८९ वा क्रमांक मिळवत यश मिळवले आहे. माळमाथा भागातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या प्रेरणा खवळे हिने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. यश मिळवणारी ती माळमाथा भागातील पहिली शेतकऱ्याची लेक ठरली आहे. कॅम्प येथील अनिकेत अहिरे यानेही देशात ९४० वा क्रमांक मिळवत यूपीएससीत यश मिळवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.