Bhandara News : बससाठी शालेय विद्यार्थ्यांना राेखावा लागला लाखांदूर वडसा राष्ट्रीय महामार्ग, पाेलिसांनी...

ग्रामपंचायत पदाधिका-यांसह सदस्यांनी विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली.
Bhandara News, Students Rasta Roko Andolan
Bhandara News, Students Rasta Roko Andolansaam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News : शाळेत जाण्यासाठी नियमित वेळेवर बस उपलब्ध नसल्याने आज (साेमवार) लाखांदूर तालुक्यातील साेनी येथील विद्यार्थ्यांनी रास्ताे राेकाे आंदाेलन छेडले. पाेलिसांनी समजूत काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदाेलन मागे घेतले. (Maharashtra News)

Bhandara News, Students Rasta Roko Andolan
Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंचे माैन, खामगावात आज सभा; काॅंग्रेस, एनसीपीसह वंचितच्या हालचालींवर पाेलिसांचे लक्ष

भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील लाखांदूर वडसा हा राष्ट्रीय महामार्ग (lakhandur wadsa national highway)विद्यार्थ्यांनी (aandolan) रोखून धरला. त्यामुळे दोन तास या रस्त्यावरील वाहतुक खाेळंबली.

Bhandara News, Students Rasta Roko Andolan
Dr. Heena Gavit News : पंतप्रधान घरकुल योजनेतील 'त्या' लाभार्थींवर कारवाई हाेणार : खासदार डॉ. हिना गावित

सोनी येथील विद्यार्थ्यांना (students) लाखांदूर तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे शिक्षणासाठी दररोज जावे लागते. मात्र शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी बसेस उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले.

त्यामुळे रास्ता रोकोचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. त्यास सोनी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठींबा देत पदाधिकारी देखील रस्त्यावर बसले. दरम्यान (bhandara) लाखांदूर पोलिसांनी सर्वांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com