Nandurbar News : रनाळातील विद्यार्थ्यांचा त्रागा, रस्त्यावर उतरुन अडवल्या एसटी महामंडळाच्या बसेस

विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला स्थानिक नागरिकांनी देखील पाठींबा दिला.
Nandurbar, Students, Ranala Village
Nandurbar, Students, Ranala Villagesaam tv
Published On: 

- सागर निकवाडे

Nandurbar News : बस वेळेवर उपलब्ध हाेत नसल्याने नंदूरबार तालुक्यातील रनाळा गावातील शालेय विद्यार्थी आज (साेमवार) भडकले. त्यातूनच त्यांनी आज रस्त्यावर येत एसटी महामंडळाच्या विराेधात आंदाेलन केले. (Maharashtra News)

Nandurbar, Students, Ranala Village
Prithviraj Chavan News : महात्मा गांधींचा खून कोणी केला? साेयीनूसार आजही RSS वर हात करत आहे : पृथ्वीराज चव्हाण

नंदूरबार तालुक्यातील रनाळा गावातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी राज्य परिवहन महामंडळास शाळेत जाण्यासाठी वेळेत बस मिळावी, एसटी बस थांब्यावरच थांबावी अशी मागणी निवेदनावर केले. वारंवार निवेदन देऊन देखील विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस उपलब्ध होत नाही. यामुळे आज विद्यार्थ्यांनी आंदाेलन छेडले.

Nandurbar, Students, Ranala Village
Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंचे माैन, खामगावात आज सभा; काॅंग्रेस, एनसीपीसह वंचितच्या हालचालींवर पाेलिसांचे लक्ष

शाळेत आणि महाविद्यालयात जाण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत महामंडळाच्या बसेस थांबवल्या. विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस उपलब्ध आणि थांबत नसेल तर आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा विद्यार्थ्यांनी आज एसटी महामंडळाला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.