Excise Department : बनावट देशी दारू कारखान्यावर छापा; ११ लाख ५० हजाराचा साठा जप्त, दाेघे अटकेत

या धाडसत्रात बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळले.
Akluj
AklujSaam Tv
Published On

Akluj : अकलूज (Akluj) येथे बनावट दारू तयार करून त्याची बाजारात विक्री केली जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये विविध कंपन्यांची बनावट दारू तयार करणारा कारखानाच उत्पादन शुल्क अधिका-यांच्या हाती लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीमध्ये सुमारे ११ लाख ५० हजार रूपयांचा बनावट मद्याचा साठा आढळून आला आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील बावडा (ता. इंदापूर) येथील प्रदीप रमेश माने व अकलूज येथील शंकर पंडीत चुनाडे या संशयितांना अटक (arrest) केली आहे.

Akluj
Kalaburagi Kolhapur Express : 'या' मागणीसाठी कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला मनसेनं दाखविले काळे झेंडे

अकलूज शहरातील राऊत नगर भागातील सोनाज पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अक्षदा बेकरी गोडाऊनमध्ये बुधवारी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. त्या ठिकाणी बनावट देशी दारू तयार होत असल्याचे दिसून आले. बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळले. (Maharashtra News)

Akluj
Chiplun : 'उद्योग मंत्री उदय सामंत आम्हांला न्याय देतील' चिपळूण दाै-याकडं सा-यांचे लक्ष

यामध्ये स्पिरिट ब्लेंड, तयार बनावट देशी दारू, देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, स्वाद अर्क, सिलिंग मशीन, बनावट बुचे, बनावट लेबल, गोवा राज्य निर्मित १८० मिली क्षमतेचे सहा पेट्यासह देशी दारू टँगो पंच, ब्लेंड ३७० लिटर, कॉन्सन्ट्रेटेड ब्लेंड ५०० लिटर, १८० मिली क्षमतेच्या बनावट देशी दारू टैगोपंच १० बॉक्स हाेते.

Akluj
Sangli Rain: भाळवणी पूल पाण्याखाली; वाहतुकदारांनाे ! 'या' मार्गाचा वापर करा, विटा प्रशासनाचं आवाहन

यासह सिलिंग मशीन, गोवा राज्य निर्मित अँड्रीयल व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या १९ बाटल्या, गोवा राज्य निर्मित कडॉवेल नंबर वन व्हिस्की १८० मिली क्षमतेचे ६ बॉक्स, देशी दारू टैगो पंच प्लास्टिक बुचे २० हजार नग, कडॉवेल नंबर बन व्हिस्की विदेशी दारूचे बचे ५००, इम्पेरियल ब्लू विदेशी मद्याची बुचे ५०० नग, देशी दारू टँगो पंच लेबल १८० मिली क्षमता ३२ हजार नग, २० लिटर क्षमतेचे रिकामे प्लास्टिक कॅन आठ याचा समावेश हाेता. (Akluj Latest Marathi News)

Akluj
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या, अन्यथा आंदोलनाचा वणवा पेटेल : तुपकर

याबराेबरच बनावट दारू बाटल्यात भरण्यासाठी नरसाळे १, विदेशी दारू तयार करण्यासाठी इसेन्स कॅरमल २०० मिली क्षमतेची एक बॉटल, १८० मिली क्षमतेच्या देशी दारू टंगो पंच रिकाम्या बाटल्या ७००० नग, पाण्याचा मोटर पंप १, पिकअप वाहन असा एकूण ११ लाख ५८ हजार ५७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती नितीन धार्मिक (सोलापूर जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क) यांनी दिली. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com