Kalaburagi Kolhapur Express : 'या' मागणीसाठी कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला मनसेनं दाखविले काळे झेंडे

कलबुर्गी सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर अशी नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यात आली.
modnimb , mns, kalaburagi to kolhapur superfast train, pandharpur news
modnimb , mns, kalaburagi to kolhapur superfast train, pandharpur newssaam tv

Pandharpur : कलबुर्गी ते कोल्हापूर सुपरफास्ट रेल्वे गाडीला (Kalaburagi to Kolhapur Train) मनसेने (MNS) आज (गुरुवार) काळे झेंडे दाखवले. मोडनिंब येथे थांबा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. (Breaking Marathi News)

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना कलबुर्गी ते कोल्हापूर ही सुपरफास्ट रेल्वे जाेडते. या ट्रेनला माढा तालुक्यातील मोडनिंब येथे प्रवाशी थांबा देण्याची मागणी प्रवाशांची आहे. या मागणीचा पाठपूरावा करण्यासाठी आज मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रेल्वेला काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. (Pandharpur Latest Marathi News)

modnimb , mns, kalaburagi to kolhapur superfast train, pandharpur news
Baramati : निमगाव केतकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको; इंदापूर - बारामती महामार्गाची वाहतुक खाेळंबली

कलबुर्गी सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर अशी नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. या गाडीला सोलापूर नंतर पंढरपूर येथे थांबा देण्यात आला आहे. मोडनिंब ही मोठी बाजारपेठ आहे. शिवाय संत सावता माळी महाराज यांचे समाधी स्थळ असलेले अरण हे जवळच आहे. (Kalaburagi to Kolhapur Train Latest Marathi News)

modnimb , mns, kalaburagi to kolhapur superfast train, pandharpur news
Andheri East Bypoll Election 2022 : 'कशाला चिंता करायची, उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे'

मोडनिंब येथे या गाडीला थांबा देण्याच्या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी गिड्डे यांनी मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचे सांगितले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com