sangli, rain, yerala bridge, traffic diverted
sangli, rain, yerala bridge, traffic divertedsaam tv

Sangli Rain: भाळवणी पूल पाण्याखाली; वाहतुकदारांनाे ! 'या' मार्गाचा वापर करा, विटा प्रशासनाचं आवाहन

गेले दोन दिवस परतीच्या पावसाने सांगलीसह वाळवा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.
Published on

Sangli Rain Update : गेल्या २४ तासापासून सांगली जिल्ह्यात पावसाची (rain) संततधार सुरू आहे. काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील येरळा नदीला पूर आल्याने इस्लामपुर भाळवणी विटा रोडवरील पुलावरून पुराचे पाणी जात आहे. यामुळं भाळवणी गावाजवळील येरळा नदीचा पूल पुन्हा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. (Tajya Batmya)

येरळा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं दुसऱ्यांदा पावसाळ्यात या मार्गावरील अवजड वाहतूक बंद झाली आहे. विटा येथील प्रशासनाने दक्षता घेत महामार्गावरील (highway) वाहतूक बंद केली. या मार्गावरील वाहतूक इस्लामपूर कुंडल फाटा येथून बलवडी मार्गे विटा अशी सुरळीत सुरु आहे. त्या मार्गाचा वाहनधारकांनी करावे असे आवाहन विटा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. (Sangli Latest Marathi News)

sangli, rain, yerala bridge, traffic diverted
Chiplun : 'उद्योग मंत्री उदय सामंत आम्हांला न्याय देतील' चिपळूण दाै-याकडं सा-यांचे लक्ष

दरम्यान परतीच्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यात विशेषत: वाळवा तालुक्यात भाजीपाला उत्पादक देखील संकटात सापडले आहेत. अनेकांच्या टोमॅटोच्या बागा पावसाने कोलमाडल्या आहेत. बहुतांश शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

sangli, rain, yerala bridge, traffic diverted
Sangli News : परतीच्या पावसाचा शेतकरी कुटुंबावर घात; घोरपडीत वीज पडून एक ठार

गेले दोन दिवस परतीच्या पावसाने सांगलीसह वाळवा तालुक्यात धुमाकूळ घातला होता. आज (गुरुवार) सकाळी वाळवा तालुक्यात धुक्याची चादर पसरलेले चित्र सर्वत्र होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी या धुक्यातुन मार्ग काढत जावे लागले. या धुक्यामुळे ग्रामीण भागात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com