Wardha News: शेती पिकांवर बुरशीजन्य रोगाचं सावट; संतप्त शेतकऱ्याने उभ्या सोयाबीन पिकावर फिरवला ट्रॅक्टर

Wardha: परिस्थिवर संताप व्यक्त करत शेतकऱ्याने थेट सोयाबीन पिकावरून ट्रॅक्टर चालवलाय.
Wardha News
Wardha NewsSaam TV
Published On: 

चेतन व्यास

Soyabean Farm:

वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर येलो मोजॅक, खोड माशीसह बुरशीजन्य रोगाने आक्रमक केले आहे. या रोगामुळे जिल्हात शेकडो हेक्टरवरवरील सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच या रोगामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या उभ्या सोयाबीन पिकावर चक्क टॅक्टर फिरवत रोष व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Wardha News
Andhra Pradesh Crime: पत्नीसह २ मुलींची गोळ्या घालून हत्या; मग स्वतःही संपवले आयुष्य, पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्याने खळबळ

वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या वाघोडा येथील हेमराज खवशी या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात फुले संगम नावाची सोयाबीन पेरली होती.मात्र या पिकावर बुरशीजन्य रोगाने आक्रमण केल्याने या सोयाबीनच्या झाडाला काहीच पीक आलं नाहीय.

यामुळे शेतकऱ्याने हतबल होत उभ्या सोयाबीन पिकावर ट्रक्टर फिरवला. शेतात सोयाबीन पिकांवर आतापर्यंत 40 ते 50 हजाराचा खर्च केलाय. तरीही सोयाबीन पिकाला काहीच उत्पन्न मिळत नसल्याने लागवडीचा खर्चही निघणार नसल्याचे चित्र होतं.

परिस्थिवर संताप व्यक्त करत शेतकऱ्याने थेट सोयाबीन पिकावरून ट्रॅक्टर चालवलाय. यावर्षी सोयाबीन पिकावर रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी सगळीकडून केली जात आहे.

वर्धा जिल्ह्यात अनेक व्यक्ती शेतीवरच उवलंबून आहेत. शेती व्यवसायातूनच आपला उदरनिर्वाह करतात. पावसाळ्यात सुरुवातीच्या दिवसांत हवा तसा पाऊस पडला नाही. गणपतीवेळी काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. आधीच पावसाची कमतरता आणि त्यात पिकांवर आलेल्या रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत.

Wardha News
Wardha Crime News : तांदळ्याच्या काळ्याबाजाराला पुरवठा विभागाचे पाठबळ? ट्रॅकसह तेरा टन तांदूळ जप्त; एकजण पाेलीसांच्या ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.