Wardha Crime News : तांदळ्याच्या काळ्याबाजाराला पुरवठा विभागाचे पाठबळ? ट्रॅकसह तेरा टन तांदूळ जप्त; एकजण पाेलीसांच्या ताब्यात

सावंगीच्या एका गोडाऊनवर पाेलीसांना टाकली हाेती धाड.
wardha news
wardha newssaam tv
Published On

- चेतन व्यास

Wardha News : रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार करणा-या एकास वर्धा जिल्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी संशयिताकडून तेरा टन तांदूळ, एक ट्रॅकसह साडे बारा लाखांचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सावंगी पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली आहे. (Maharashtra News)

wardha news
Navegaon-Nagzira Tiger Reserve Project : नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी सुरु

वर्धेच्या सावंगी मेघे परिसरात पोलिसांनी एका गोडाऊनवर धाड टाकत रेशनिंगच्या तांदुळाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख रहीम याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. सावंगी मेघे पोलिसांनी (कलम 124 अनुसार कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तांदुळाच्या काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

wardha news
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी' ला लाॅरी असाेसिएशनचे पाठबळ, कारखानदारांचा डाव माेडीत काढू, साखरेच्या पाेत्यांवर पाणी ओतणार; कार्यकर्ते आक्रमक

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सावंगी मेघे परिसरात शेख रहीम हा मागील काही दिवसांपासून रेशनिंगच्या तांदुळाचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावंगी मेघे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सावंगीच्या एका कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या गोडाऊनवर धाड टाकली.

या तपासणीत एका ट्रॅकसह पोलिसांना तेरा टन तांदूळ आढळून आला. याबाबत रहीम याच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आढळून आली नाही. पोलीसांनी त्याला कायदाचा बडगा दाखविला.

कोरोनाकाळापासून स्वस्त धान्य दुकानात तांदूळ हा नागरिकांना मोफत दिल्या जातं आहे. याचाच फायदा घेत रेशनिंगच्या तांदुळाचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात काळाबाजार केला जातं आहे.

पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी यापूर्वी पुलगाव येथे धाड टाकत महेश अग्रवाल नामक व्यापाऱ्यावर कारवाई केली होती. यानंतर आर्वी येथे कारवाई करण्यात आली तर आता सावंगीतही काळाबाजार करणाऱ्याचा भंडाफोड केला.

वर्धा (wardha) जिल्ह्यात सुरु असलेल्या तांदुळाच्या या काळाबाजाराकडे पुठावठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईलाही पुरवठा विभाग पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचंही पाहवयास मिळत आहे. यामुळे या काळ्याबाजाराला पुरवठा विभागाचे समर्थन तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

wardha news
Rayat Kranti Sanghatana : ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 500 रुपये द्या : सदाभाऊ खाेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com