मुळात ज्या EVM मशिन्स मतदानानंतर स्ट्रॉंग रूममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं EVMमध्ये हेराफेरी करण्यासाठीच मशिन तिथे आणल्या का?असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर त्यांनी टीका केलीय..
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी पाहणी केली. या EVM मशिनमध्ये मतदान झालेले नाही. त्या राखीव असल्याची माहिती होळकर यांनी दिलीय..
कुरुल गटात भाजपचे सचिन जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. अशा अटीतटीच्या सामन्यात ईव्हीएम रस्त्यावर सापडल्यानं मतदारांच्या मनातही संशयाची पाल चुकचुकली... सध्या या दोन्ही ईव्हीएम मशिन्स मोहोळच्या स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या EVM मशिन्स 'राखीव' असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी मतदानाच्या दिवशी इतका बेजबाबदारपणा कसा ? असा सवाल उपस्थित होतोय. प्रशासनाचा 'राखीव मशिनचा' खुलासा विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. याआधीच महापालिका निवडणूक दरम्यान विरोधकांनी मतदारयाद्यांमधील घोळ आणि इव्हीएमवर संशय उपस्थित करत सत्ताधा-यांविरुद्ध रान उठवलंय. त्यात मोहोळमधील घटनेची भर पडली आहे. आता कुरुल गटात काय निकाल लागतोय ? आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.