Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सोलापुरात पहिली आत्महत्या; संभाजीनगरमध्येही २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Maratha Reservation Updates: सोलापूर जिल्ह्यात आरक्षणासाठी एका दिव्यांग तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर आणि संगमनेरमध्येही आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्याSaam TV
Published On

Maratha Reservation Updates

मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील आहे, आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी केलं होता. मात्र, तरी देखील मराठा आंदोलकांकडून टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात आरक्षणासाठी एका दिव्यांग तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर आणि संगमनेरमध्येही आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या
Karnataka ST Bus Service: मराठा आंदोलनाचा धसका, कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व एसटी बससेवा बंद

पंढरपूर तालुक्यातील तारापूर गावातील एका दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे‌. ही घटना तालुक्यातील तारापूर येथे मंगळवारी पहाटे घडली आहे. विलास कृष्णा क्षीरसागर असं या तरूणाचे नाव आहे. विलास हा मराठा आंदोलनात सहभागी झाला होता.

पंढरपुरात दिव्यांग तरुणाची आत्महत्या

सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत तो आंदोलन स्थळी होता. घरी आल्यानंतर त्याने जवळच असलेल्या झाडाला भगव्या शेल्याने गळफास घेवून आपलं जीवन संपवलं. दरम्यान, या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. शुभम अशोक गाडेकर असे या तरुणाचे नाव आहे. शुभम हा कोलठाण गावचा रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येने मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

संगमनेरमध्ये आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील झोळे गावात एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आम्ही जातो आमच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा, आरक्षण मिळत नसल्याने मी जीवन संपवतो आहे, अशी चिठ्ठी या तरुणाने लिहून ठेवली. सागर भाऊसाहेब वाळे (वय २५ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक, मात्र अजित पवार जाणार नाहीत? कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com