मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जातं आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं असून जाळपोळीच्या घटना घडत आहेत. हीच बाब लक्षात घेता आता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या बसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आरक्षणाच्या मागणीवरुन (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी आंदोलकांनी बसेस पेटवून दिल्या आहेत. मराठा आंदोलकांकडून कर्नाटकच्या बसेस टार्गेट केल्या जात असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे.
याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापुरात राज्य परिवहन महामंडळाच्या 'एसटी'वर (ST Bus) दगडफेक करून मोडतोड करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.
कुरुंदवाड ते पुणे स्टेशन बस ही दत्त कारखाना शिरोळ येथे थांबली होती. दरम्यान, तीन-चार अज्ञात व्यक्तींनी येऊन बसवर चारही बाजूने दगडफेक केली. समोरील व मागील दोन्ही बाजूंच्या काचा फोडल्या. सुदैवाने या तोडफोडीत कोणीही प्रवासी जखमी झालेला नाहीत.
दुसरीकडे महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच ३१ ऑक्टोबर सकाळी १० वाजेपासून ते २ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत हा प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती काळादिन पाळून रॅली काढून नंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करणार आहे. काळादिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई चंद्रकांत दादा पाटील , मंत्री दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने येणार असल्याची शक्यता आहे.
त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषेत तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण व कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.