Nashik Maratha Andolan: आरक्षण मिळालंच पाहिजे! ७ महिन्यांच्या तान्हुल्यासह आईचं आमरण उपोषण सुरू

Maratha Reservation: नाशिकमध्येही महिलांचे उपोषण सुरू आहे. अशात आता एक महिला आपल्या ७ महिन्यांच्या बाळाला घेऊन मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसली आहे.
Nashik Maratha Andolan
Nashik Maratha AndolanSaam TV
Published On

Maratha Hunger Strike:

मराठा आरक्षणासाठी प्रत्येक गावातून नागरिक रस्त्यावर उतरलेत. आपली मागणी मान्य व्हावी आरक्षण मिळावे यासाठी महिला देखील आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरल्यात. बीडसह अन्य ठिकाणी महिलांनी साखळी उपोषणालाही सुरूवात केली आहे. नाशिकमध्येही महिलांचे उपोषण सुरू आहे. अशात आता एक महिला आपल्या ७ महिन्यांच्या बाळाला घेऊन मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Maratha Andolan
Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा नागपूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ७ महिन्यांच्या बाळाला घेऊन महिलेचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ७ महिन्यांच्या बाळाला घेवून दिपाली पाटील आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झाल्यात.

नाशिकरोडयेथे आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळालासोबत घेऊन दिपाली झोंड पाटील या साखळी उपोषणात सहभागी झाल्या आहेत. माझ्या या सात महिन्यांच्या मुलासह राज्यात इतर अनेक लाखो लहान मुलं आहेत. यांच्या भविष्याचा विचार करून या उपोषणात सहभागी झाल्याचं दिपाली झोंड यांनी म्हटलंय.

आरक्षण नाही तोपर्यंत शाळा नाही...

मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण अत्यंत शांततेत सुरू आहे. दरम्यान, आसू गावातील असंख्य विद्यार्थींनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र तसेच ओबीसी प्रवर्गातून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शेळत जाणार नसल्याचा निर्धार केला आहे.

Nashik Maratha Andolan
Mumbai Crime News: खळबळजनक..! सार्वजनिक शौचालयात महिलेचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत; घातपाताचा संशय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com