सोलापूर : प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांची महापालिका (Bachchu Kadu) आरोग्यधिकाऱ्याने दिशाभूल केली. याचा निषेध म्हणून आज प्रहार जनशक्तीच्यावतीने चिखलात झोपून आंदोलन केले. (Solapur) यावेळी महापालिकेचा निषेध देखील करण्यात आला. (Maharashtra News)
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे कांही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून बच्चू कडू यांची दिशाभूल करत दिव्यांगांच्या फिजिओथेरपी सेंटरला घेऊन न जाता दुसऱ्याच ठिकाणीचे सेंटर दाखवल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. याचा निषेध करत आज प्रहार कडून मनपाच्या धुळखात पडून असलेल्या फिजिओथेरपी सेंटर समोरील चिखलात झोपून आंदोलन करण्यात आलं आहे.
त्या अधिकाऱ्याचे तोंड काळे करण्याचा इशारा
मागच्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेच फिजिओथेरपी सेंटर बंद आहे. त्यामुळे असंख्य दिव्यांग बांधवांची गैरसोय होत असल्याचा आरोप प्रहार कडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा त्यांच तोंड काळ करण्याचा इशारा प्रहारकडून देण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.