Bribe Trap: संशोधक सहाय्यक ३५ हजाराची लाच घेताना ताब्यात; जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागितली रक्कम

Jalna News : संशोधक सहाय्यक ३५ हजाराची लाच घेताना ताब्यात; जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागितली रक्कम
Bribe Trap
Bribe TrapSaam tv

जालना : जालन्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील संशोधक सहाय्यकानी मुस्लिम (Jalna) तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी लाच मागितली. ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Bribe) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

Bribe Trap
Kalyan Crime News: कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या; हल्लेखोर पसार

जालन्यातील तक्रादार यांनी मुस्लिम तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. नियमानुसार त्यांनी सर्व पुरावे सुद्धा कार्यालयात जमा केले होते. दरम्यान मुस्लिम तेली जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्यांना विलंबी होत असल्याने तक्रादार यांनी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वारंवार चकराही मारल्या होत्या. त्याच दरम्यान कार्यालयातील संशोधक सहाय्यक राहूल बनसोडे यांनी त्यांना प्रमाणपत्र वैधतेसाठी लाच मागितली.

Bribe Trap
Jalgaon News: गवत कापताना लागला विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

सापळा रचत घेतले ताब्यात 

तक्रादार यांना लाच देण मान्य नसल्याने त्यांनी या बाबत (ACB) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर तडजोडीअंती ३५ हजाराची लाच देण्याचे ठरल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज पंचांच्या समक्ष संशोधक सहाय्यक राहूल बनसोडे याला रंगेहात लाच स्वीकारताना पकडून ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com