Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

Kalyan Crime News: कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या; हल्लेखोर पसार

Kalyan News : कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या; हल्लेखोर पसार
Published on

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याणच्या दुर्गाडी पुलाजवळ ट्रकचा टायर खराब झाल्याने ट्रक बाजूला घेऊन उभा असलेल्या ट्रक चालकाची अज्ञात इसमानी चाकुने भोसकून हत्या केल्याची घटना (Kalyan) कल्याणमध्ये घडली. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Kalyan Crime News
Gulabrao Patil News: दुसऱ्यासोबत जाऊन विश्वास संपादन करणे कठीण; मंत्री गुलाबराव पाटील

कल्याण पश्चिमेत एका ट्रक चालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली. भोलाकुमार महतो असे मयत (Crime News) ट्रकचालकाचे नाव आहे. भोलाकुमार आज पहाटेच्या सुमारास ट्रक घेऊन शहाडच्या दिशेने जात होता. दरम्यान कल्याण दुर्गाडी पुलाजवळ त्याच्या ट्रकच्या टायरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्याने ट्रक बाजूला घेतला व तो खाली उतरला. 

Kalyan Crime News
Maratha Aarkshan: बीडमध्ये मराठा बांधव आक्रमक; १५ गावातील नागरिकांचा दुचाकी मोर्चा

हल्लेखोरांचा शोध सुरु 

याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने भोसकून त्याची हत्या केली. घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com