Solapur Accident: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकने दुचाकीला चिरडलं, २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Solapur-Hyderabad Highway Accident: सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात झाली आहे. एका ट्रकने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना चिरडले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Solapur Accident
Solapur AccidentSaam Tv
Published On
Summary

हैदराबाद सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

ट्रकने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना चिरडले

दोन मित्रांचा मृत्यू

हैदराबाद सोलापूर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. महामार्गावरील बोरामणी नाका येथे एका ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. दुचाकीवरील दोघांना चिरडलं आहे. या दुचाकीवर बसलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महामार्गावरील इतर वाहने थांबली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Solapur Accident
Accident : मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक; आरोपी फरार

महामार्गावर भीषण अपघात

हैदराबाद–सोलापूर महामार्गावरील ट्रक जात होतो. ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील दोघेही खाली पडले आणि या दोघांनाही ट्रकने चिरडले. या अपघातात सैफन शेख आणि फरीद पटेल या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.हे दोघेही मित्र होते. दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत दोघेही दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे रहिवासी आहेत. ते आचारी काम करत होते. कामाच्या ऑर्डरसाठी ते सोलापुरात आले होते. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घालत या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अपघात अत्यंत भीषण असल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Solapur Accident
Buldhana Accidnet News : पुण्याला निघालेल्या खासगी बसचा टायर फुटला, कळमनुरीतील 12 प्रवासी जखमी

अमरावतीत भीषण अपघात

अमरावतीत काल असाच एक अपघात झाला होता. यामध्ये एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.एका अॅम्ब्युलन्सने कारला धडक दिली. अमरावतीत धामणगाव तालुक्यात ८ वर्षीय मुलगी आपल्या आईवडिलांसोबत कारने घरी जात होता. तेवढ्यात समोरुन अॅम्ब्युलन्सने कारला जोरात धडक दिली. यात मुलीचा मृत्यू झाला तर तिचे आईवडील गंभीर जखमी आहे. पोटच्या लेकीचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्याने आईवडिलांनी आक्रोश केला.

Solapur Accident
Accidnet News: दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू, सोयगाव तालुक्यात भीषण अपघात

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com