लव्ह मॅरेजचा भयानक शेवट! नवऱ्याने 50 वार करून बायकोला भर रस्त्यात निर्घृणपणे संपवलं, सोलापूर हादरलं

solapur barshi crime news : सोलापूरच्या बार्शीमध्ये लव्ह मॅरेजचा भयानक शेवट झाला आहे. नवऱ्याने 50 वार करून बायकोला भर रस्त्यात निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे.
solapur crime news
solapur newsSaam tv
Published On
Summary

सोलापूरच्या बार्शीत भररस्त्यात पत्नीची निर्घृण हत्या

नवऱ्याने बायकोवर चाकूचे तब्बल ५० वार केले

नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून केलाय

सोलापूरच्या बार्शी शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शीच्या गाडेगाव रोड परिसरात घडलेल्या थरारक घटनेने शहर हादरलं आहे. ऋषिकेश पाटील नावाच्या तरुणाने बायको धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. नवऱ्याकडून चारित्र्याच्या संशयातून बायकोची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटील हा बजाज फायनान्समध्ये कार्यरत होता. तर त्याची बायको धनश्री पाटील ही बँकेत नोकरी करत होती. ऋषिकेश पाटीलचा बायको धनश्रीच्या चारित्र्यावर संशय होता. ऋषिकेश हा बार्शी-परंडा रोडवरील एका बिअर बार समोर होता. त्याचवेळी त्याची बायको धनश्री दुचाकीवरून जात होती. त्यावेळी नवऱ्याने बायको धनश्रीची वाट अडवून चाकूने सपासप वार केले. त्याने तिच्यावर जवळपास ५० वार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

solapur crime news
Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य

धनश्रीवर धारदार शस्त्राने वार करताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. ऋषिकेशने धनश्रीला वाचवण्यास येणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.

solapur crime news
Kalyan Politics: दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले; ठाकरे गटाचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल

ऋषिकेशने धनश्रीची हत्या केल्यानंतर स्वत: बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल पोहोचले. पोलिसांच्या फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणाचा तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत. तत्पूर्वी, ऋषिकेश आणि धनश्री या दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. मात्र, वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या संशयातून ही धक्कादायक घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com