Vishwas Patil: 'मालिकेत स्वराज्यरक्षक शब्द म्हणजे अमोल कोल्हेंची चलाखी', ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची जोरदार टीका; फेसबूक पोस्ट व्हायरल

छत्रपती संभाजीराजे हे धर्मरक्षकचं होते, "स्वराज्यरक्षक" हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार श्री अमोल कोल्हे यांनी वापरला आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हणले आहे.
Amol kolhe Vishwas Patil
Amol kolhe Vishwas PatilSaamtv
Published On

Vishwas Patil: राज्याच्या राजकारणात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मरक्षक उल्लेख करावा की स्वराज्यरक्षक करावा याबद्दल मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मरक्षक म्हणू नका असे म्हणले होते, इथूनच या वादाला सुरूवात झाली होती. सत्ताधाऱ्यांनी यावर आक्षेप घेत अजित पवार यांनी माफी मागावी अशीही मागणी केली होती.

यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच आहेत अशी भूमिका घेतली होती. यावर जेष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी खुलासा करत अमोल कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवर टीका केली आहे.

Amol kolhe Vishwas Patil
Sanjay Raut News: 'हे राजकीय धंदे बंद करा...', योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो, संजय राऊतांनी केली जोरदार टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, जेष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत अमोल कोल्हे यांचा छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक असल्याचा दावा खोडून काढला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी "संभाजीराजांना 'धर्मवीर' म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे! कागदपत्रे साक्ष देतात! 'स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सीरियलसाठी वापरले इतकेच" असा घणाणात केला आहे.

काय आहे विश्वास पाटील यांची पोस्टः

या पोस्टमध्ये विश्वास पाटील (Vishwas Patil) म्हणतात की, अस्सल कागदपत्रे सांगतात की , गेली 105 वर्ष महाराष्ट्र शंभूराजांना "धर्मवीर" या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः जे दानपत्र लिहून दिले आहे. आज-काल विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.

Amol kolhe Vishwas Patil
Jalgaon Accident News: डोळ्यादेखत आईचा मृत्यू; उपचारादरम्‍यान मुलानेही मिटले डोळे

या पोस्टच्या शेवटी विश्वास पाटील यांनी तात्पर्य, "गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख "धर्मवीर" असाच करत आला आहे. ग दि माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा "धर्मभास्कर" असा केला होता. अन्यथा "स्वराज्यरक्षक" हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार श्री अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही." असे म्हणत अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com