न्यायालयाचा निकाल समजताच नारायण राणे गटास बसला धक्का

आमदार नितेश राणेंसह अन्य संशयित आराेपींनी न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत.
court
court

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा बँक निवडणुकीसाठी कणकवली वगळता अन्य ठिकाणी शांतते मतदान सुरु आहे. दरम्यान मतदानासाठी जाता यावे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे गटाचे उमेदवार मनीष दळवी यांचा अंतरिम (तात्पूरता) जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. sindhudurg dcc bank election latest news

court
कणकवली : नितेश राणेंचा उल्लेख टाळत संताेष परब म्हणाले...!

संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंसह (nitesh rane) अन्य संशयित आराेपींनी न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राणे गटातील मनीष दळवी यांचा समावेश आहे. दळवी हे स्वतः बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दळवी यांना अटकेपासून संरक्षण हवे हाेते यासाठी त्यांनी न्यायालयात (court) धाव घेत तात्पूरता जामीन मिळावा यासाठी अर्ज केला हाेता.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्या समाेर त्याबाबत सुनावणी झाली. कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे या मुद्यावर न्यायाधीश हांडे यांनी दळवींचा अंतरिम जामीन नाकारला आहे. दरम्यान दळवी यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर दुपारनंतर निर्णय हाेण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (dcc bank) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढत हाेत आहे. यंदाच्या निवडणुकीत (election) केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com