संजय सूर्यवंशी, साम टीव्ही
नांदेड : सहस्रकुंड धबधबा येथील महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. दर्शन घेऊन परतत असताना कमांडर जीपचा तोटंबा घाटात भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात हा अपघात घडला. तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी येथील काही भाविक सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते कमांडर जीपने परतत असताना घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप थेट झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर जीपमधील सात जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कुबेर येथे हलवण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.