Amravati: शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार

घारड यांच्या मांडीला गोळी लागली असल्याची प्राथमीक माहीती समोर आली आहे.
Yogesh Gharad
Yogesh GharadSaam Tv

अमर घटारे

अमरावती - जिल्ह्यात शनिवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर मुलताई चौक परीसरामधे गोळीबार करण्यात आला आहे. यात योगेश घारड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) आणण्यात आले असल्याची माहित समोर आली आहे. घारड यांच्या मांडीला गोळी लागली असल्याची प्राथमीक माहीती समोर आली आहे. योगेश घारड यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला,याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हे देखील पाहा-

योगेश घारड हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा क्षेत्रातचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मूलताई चौकात योगेश घारड यांच्यावर रात्री ९ च्या सुमारास हा गोळीबार झाला.

Yogesh Gharad
''धर्माच्या आधारावर स्वतंत्र देश बनलाय तिकडे जा, नाहीतर आम्ही काहीही करु''

सुरुवातीला हा हल्ला अज्ञातांनी केला असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यानंतर हा हल्ला राहुल तडस नावाच्या एका व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराचा पाठलागही करण्यात आला. योगेश घारड यांच्यासोबत असणारे नंदू काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरोचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर पसार झाला. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com