''धर्माच्या आधारावर स्वतंत्र देश बनलाय तिकडे जा, नाहीतर आम्ही काहीही करु''

दिल्लीतील जहांगिरपुरीमध्ये झालेल्या बुलडोझर कारवाईवरती देशातून रोष व्यक्त केला जात आहे.
Pragya Singh Thakur
Pragya Singh ThakurSaam TV

नवी दिल्ली: दिल्लीतील जहांगिरपुरीमध्ये (Jahangirpuri) झालेल्या बुलडोझर कारवाईवरती देशातून रोष व्यक्त केला जात असतानाच भाजप खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी याचे समर्थन केले आहे. बुलडोझरच्या कारवाईवर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या "आम्ही मिरवणूक काढतो, ते हल्ले करतात, स्वतंत्र भारतात धर्माच्या आधारावर त्यांच्यासाठी देश बनवला गेला आहे तिथे जा, हिंदूंना या देशात पूजेचे स्वातंत्र्य आहे, राहील. त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो." दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी हिंसाचार झाला होता. त्यामध्ये दोन गटात दगडफेक झाली होती, पोलिसांवरतीही हल्ला करण्यात आला होता.

जहांगीरपुरीमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर दिल्ली महापालिकेने अतिक्रमणाविरोधामध्ये सुरू केलेल्या बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २ आठवडे कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश फक्त जहांगीरपूर पर्यंत मर्यादित आहे. जहांगीरपुरमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी २ गटात हिंसाचार (Violence) उसळला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड करण्यास सुरुवात देखील केली होती. त्यानंतर भाजपच्या (BJP) नेतृत्वात असलेल्या दिल्ली महानगरपालिकेने (Corporation) या भागात कारवाईस सुरुवात केली होती. ही कारवाई अतिक्रमण विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com