धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात मैदा पायाने तुडवल्याचा कथित व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
FDA
FDA saam tv
Published On

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा मैदा चक्क पायाने तुडवला जात असल्याचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या संतापजनक व्हिडिओमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक युवक मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला मैदा चक्क पायाने तुडवताना दिसत आहे. हा मैदा स्थानिक हॉटेल्समध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे "नागरिकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू आहे का?" असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हॉटेल आणि खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतात. मात्र, जानेफळ येथील या धक्कादायक व्हिडिओने अन्न सुरक्षेचा (Food Safety) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

FDA
Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

"अन्न व औषध प्रशासन विभाग नेमका झोपला आहे का?" असा संतप्त सवाल विचारत, संबंधित हॉटेल आणि दोषी व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. दरम्यान, या कथित व्हायरल व्हिडिओची सत्यता अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FDA
Kalyan : कल्याणमध्ये भररस्त्यात हाणामारी! रागारागात आला बाईकला लाथ मारली, मागून येणाऱ्या व्यक्तीने धुधू धुतलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com