Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

ashok Kharat news : एसआयटीनं भोंदू खरातचा मोबाईल जप्त केल्यानंतर राज्याला हादरवणारे खुलासे समोर आले आहेत. खरातच्या मोबाईलमधून किती राजकीय नेत्यांची नावं समोर आली आहेत ? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट
Fake godman Ashok Kharat
Fake godman Ashok Kharat Saam Tv
Published On

महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदू खरातच्या एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे होत आहेत. एसआयटीनं जप्त केलेल्या मोबाईलमधून खरातने कोडवर्डमध्ये सेव्ह केलेले नंबर, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहारांची माहिती रिकव्हर करायला सुरुवात केलीय..

Fake godman Ashok Kharat
Ashok Kharat: शिंग आणून पूजा, उच्चभ्रू लोकांना द्यायचा कस्तुरी; अशोक खरातवरील नव्या आरोपांनी राज्यभरात खळबळ

खरं तर हे राजकीय नेते प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतांना खरातचा सल्ला घ्यायचे... अगदी निवडणुकीचा अर्जही भरतानाही खरातने सांगितलेला मुहूर्त पाळायचे त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेत भोंदू खरातचा किती हस्तक्षेप होता आणि राजकीय नेते किती अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते... याचं चित्र स्पष्ट होतंय.. आता खरातचे 40 ते 45 राजकीय नेते भक्त असल्याचं समोर आलं असलं तरी याआधीच शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी खरातकडे फक्त आपणच नाही तर आणखी 39 आमदारांनी हजेरी लावल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता..

Fake godman Ashok Kharat
अशोक खरातच्या संपत्तीत 7400 टक्क्यांची वाढ; 7 वर्षात कशी वाढली संपत्ती? फाईल्समधून धक्कादायक माहिती समोर

आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे खरातसोबत फोटो समोर आलेत.. रुपाली चाकणकरांना महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय.. आता एसआयटीच्या तपासात खरातच्या चरणी नतमस्तक होणाऱ्यांची माहिती आढळून आल्यानं अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे एसआयटीनं या प्रकरणाचा सखोल तपास करुन खरातच्या भक्तगणांमध्ये सत्ताधारी होते की विरोधक याचा विचार न करता ज्यांचे संबंध आढळतील त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे.. तरच राज्यात वाढत चाललेलं भोंदूगिरीचं प्रस्थ उखडून टाकता येईल...आणि महाराष्ट्राची पुरोगामी ओळख पुन्हा एकदा मजबूत करता येईल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com