Shocking : रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचली नाही, गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू; चंद्रपूरमधील भयंकर वास्तव

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये रस्त्याअभावी एका २५ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्रसूती झाली, मात्र रक्तस्त्रावामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा जीव गेला.
PREGNANT WOMAN DIES DUE TO LACK OF ROAD CONNECTIVITY IN CHANDRAPUR'S REMOTE GHODANKAPPI VILLAGE
PREGNANT WOMAN DIES DUE TO LACK OF ROAD CONNECTIVITY IN CHANDRAPUR'S REMOTE GHODANKAPPI VILLAGESaam Tv
Published On
Summary
  • चंद्रपूरमध्ये रस्त्याअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू

  • रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिलेची प्रसूती

  • प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे आणि उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

  • सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिदुर्गम घोडनकप्पी गावात एक धक्कादायक घटना घडली. गावाला जोडणारा बारमाही रस्ता नसल्यामुळे एका २५ वर्षीय गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेने सुविधांच्या अभावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता तुळशीराम गेडाम या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने त्यांना डोंगर-दऱ्या, ओढे आणि पायवाटांचा आधार घ्यावा लागला. रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रस्त्यातच संगीता यांची प्रसूती झाली आणि त्यांनी एका बाळाला जन्म दिला.

PREGNANT WOMAN DIES DUE TO LACK OF ROAD CONNECTIVITY IN CHANDRAPUR'S REMOTE GHODANKAPPI VILLAGE
Mumbai : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दोन संशयितांच्या पॉलीग्राफ चाचणीला न्यायालयाची मंजुरी

मात्र बाळाच्या जन्मानंतर संगीता यांची तब्बेत बिघडली. प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. अशा परिस्थितीत तातडीच्या उपचारांची गरज होती. परंतु दुर्गम भाग आणि रस्त्याच्या अभावामुळे रुग्णवाहिका गावाजवळ पोहोचू शकली नाही. कुटुंबीयांनी जीवाचे रान करून तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेली. अखेर उपचार मिळण्यापूर्वीच संगीताचा मृत्यू झाला.

PREGNANT WOMAN DIES DUE TO LACK OF ROAD CONNECTIVITY IN CHANDRAPUR'S REMOTE GHODANKAPPI VILLAGE
Monsoon Update : पावसाचा लेटमार्क! 'या' तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; IMD चा नवीन अंदाज

या घटनेनंतर संगीताचे पती तुळशीराम गेडाम यांनी दुःख व्यक्त केले. “गावाला रस्ता असता तर माझ्या पत्नीचा जीव वाचला असता. आम्हाला आता केवळ आश्वासनं नकोत, तर कायमस्वरूपी रस्ता हवा,” अशी त्यांची व्यथा आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, घोडनकप्पी आणि परिसरातील गावांमध्ये रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली, आंदोलनेही करण्यात आली. मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. परिणामी, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि विद्यार्थ्यांनाही दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या घटनेनंतर तरी प्रशासन आणि शासनाने जागे होऊन दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com