Mumbai : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दोन संशयितांच्या पॉलीग्राफ चाचणीला न्यायालयाची मंजुरी

Mumbai Crime News : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दोन संशयितांच्या पॉलीग्राफ चाचणीस मंजुरी दिली असून अमरेंद्र मिश्राने संमती नाकारल्याने त्याच्यावरील मागणी फेटाळण्यात आली.
Abhishek Ghosalkar Facebook Live Murder Case
Abhishek Ghosalkar Facebook Live Murder CaseSaam tv
Published On
Summary
  • उबाठा सेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट

  • मुंबई दोन आरोपींना पॉलीग्राफ चाचणीस मंजुरी दिली

  • अमरेंद्र मिश्रा याने चाचणीस नकार दिल्याने सीबीआयची मागणी फेटाळली

  • हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल अमरेंद्र मिश्रा याचे असल्याचे तपासात उघड

संजय गडदे, मुंबई

Abhishek Ghosalkar Facebook Live Murder Case उबाठा सेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या गाजलेल्या हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दोन संशयितांच्या पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर) चाचणीस परवानगी दिली असून, आरोपी अमरेंद्र मिश्रा याने संमती न दिल्यामुळे त्याच्यावरील चाचणीची मागणी फेटाळून लावली आहे.

या प्रकरणाची सुनावणी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश अजित यादव यांच्यासमोर झाली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) न्यायालयात अर्ज दाखल करून अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि रायन गोरे यांच्याकडे घोसाळकर हत्या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी या तिघांची पॉलीग्राफ चाचणी घेण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान मेहुल पारेख आणि रायन गोरे यांनी स्वेच्छेने पॉलीग्राफ चाचणीस संमती दर्शवली. चाचणीचे स्वरूप, त्याचे संभाव्य परिणाम तसेच कायदेशीर बाबींची पूर्ण माहिती असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पॉलीग्राफ चाचणीस मंजुरी दिली.

Abhishek Ghosalkar Facebook Live Murder Case
Shocking: "मी ईश्वराचा अवतार..." म्हणत जाळ्यात ओढलं, IT कंपनीतील महिला मॅनेजरवर सलग २५ वर्ष अत्याचार

मात्र, आरोपी अमरेंद्र मिश्रा याने पॉलीग्राफ चाचणीस स्पष्ट नकार दिला. भारतीय कायद्यानुसार अशा प्रकारची चाचणी संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय घेता येत नसल्याने न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे मिश्रा याच्यावर सध्या पॉलीग्राफ चाचणी होणार नाही.

Abhishek Ghosalkar Facebook Live Murder Case
Monsoon Update : पावसाचा लेटमार्क! 'या' तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; IMD चा नवीन अंदाज

अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी २०२४ रोजी दहिसर येथील मॉरिस नऱ्होन्हा यांच्या कार्यालयात फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून मॉरिस नऱ्होन्हाने लाईव्ह दरम्यानच घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.

Abhishek Ghosalkar Facebook Live Murder Case
Ladki Bahin Yojana : लाडकीच्या खात्यात मेचा हप्ता जमा, 'या' दीड लाख महिला अपात्र; काय आहेत कारणं? जाणून घ्या

तपासादरम्यान हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल हे मॉरिस नऱ्होन्हाचा खासगी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सध्या सीबीआयकडून प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, पॉलीग्राफ चाचणीमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तपासातून हत्येमागील संपूर्ण कट आणि सत्य समोर येईल, अशी अपेक्षा घोसाळकर कुटुंबीय तसेच समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com