पुण्यातील महिलेवर २५ वर्ष लैंगिक अत्याचार
कॉम्प्युटर शिकवण्याच्या बहाण्याने केले काळे कृत्य
पोलिसांत तक्रार दाखल
भोंदू बाबाचं पितळं उघडं पडलं
Pune IT Women Rape Case : स्वतःला 'ईश्वराचा अवतार' आणि आध्यात्मिक गुरु असल्याचे भासवत एका उच्चशिक्षित महिलेवर तब्बल २५ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा याच्यासह त्याच्या अनेक साथीदारांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला सध्या पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ती मूळची हरियाणातील हिसार येथील रहिवासी असून तिचे वडील प्रतिष्ठित डॉक्टर होते. वर्ष २००० मध्ये कुटुंबाची ओळख स्वामी केवल नयन' याच्याशी झाली. त्यांने घरात वाईट शक्तींचा वावर असल्याचे सांगून कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कुटुंबाची ओळख राधामोहन मिश्रा याच्याशी करून देण्यात आली.
तक्रारीनुसार, मिश्रा याने स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत कुटुंबावर मानसिक वर्चस्व निर्माण केले. "मला गुरु मानले नाही तर मोठे नुकसान होईल," अशी भीती दाखवून त्याने कुटुंबाला आपल्या प्रभावाखाली घेतले. दरम्यान, शिक्षण घेत असताना पीडितेला कॉम्प्युटर शिकवण्याच्या बहाण्याने खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर २०१० मध्ये कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. वडगावशेरी आणि नंतर वाघोली परिसरात राहत असताना आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि मानसिक छळही केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पीडितेने २०१६ मध्ये आपल्या आई-वडिलांना या अत्याचाराबाबत माहिती दिली होती. मात्र, आरोपीच्या प्रभावाखाली असलेल्या कुटुंबीयांनी तिच्यावरच अविश्वास दाखवल्याचा आरोप आहे. अखेर दीर्घकाळ सुरू असलेल्या छळाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी राधामोहन मिश्रा, श्वेता मिश्रा, स्वामी केवल नयन, गोविंद ब्रह्मचारी, नारायण साई, श्वेता पांडे यांच्यासह इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ तसेच अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.