Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर
Maratha leader Manoj Jarange Patil saam tv

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

Maratha leader Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली. त्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Published on

Summary -

  • मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड

  • हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली

  • बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचा आरोप

  • जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात पोलिसांना दिले निवेदन

योगेश काशिद, बीड

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे. बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असून बीडमधील एका बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे. मनोज जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या. मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलिस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे.

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर
Manoj Jarange: मनोज जरांगे नावाचा माणूस बिनडोक, राज्यात विष पेरण्याचे काम केले; या नेत्याचा गंभीर आरोप|VIDEO

मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे समोर आली आहेत. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे. काही कोटींची ऑफर देऊन हा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. ऑफर देणारा बडा नेता परळीचा असल्याचे सांगितले जात आहे.

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर
Manoj Jarange: आरक्षणाची लढाई नेत्यांना संपवण्यावर? दादांना संपवण्यासाठी भुजबळांकडून षडयंत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com