Manoj Jarange: आरक्षणाची लढाई नेत्यांना संपवण्यावर? दादांना संपवण्यासाठी भुजबळांकडून षडयंत्र

Political Earthquake in Maharashtra: अजित पवारांना संपवण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगेंनी केलाय.. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना संपवण्याचा कट कोण रचतंय? जरांगेंनी कोणत्या नेत्यांवर आरोप केलाय?
Manoj Jarange alleges Chhagan Bhujbal plotting a political conspiracy to eliminate Deputy CM Ajit Pawar; Maharashtra politics in turmoil.
Manoj Jarange alleges Chhagan Bhujbal plotting a political conspiracy to eliminate Deputy CM Ajit Pawar; Maharashtra politics in turmoil.Saam Tv
Published On

छगन भुजबळ हे अजित पवारांना संपवण्याचं मोठं षडयंत्र रचत असल्याचा आरोप करुन जरांगेंनी खळबळ उडवून दिलीय..फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीत अजित पवारच नाही तर फडणवीसांना अडचणीत आणून जुना हिशोब चुकता करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावाच जरांगेंनी केलाय..

एवढंच नाही तर भुजबळांच्या राजकीय बंडाचा दाखला देत भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा घात केल्याचा आरोप जरांगेनी केला आहे.यापुढे जात, आता भुजबळांसह मुंडेंच्या निशाण्यावर अजित पवार आणि फडणवीस असल्याचा गौप्यस्फोट जरांगेनी केलाय. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भुजबळांनी मात्र एका वाक्यात जरांगेंचे आरोप धुडकावुन लावले आहेत

1991 मध्ये छगन भुजबळांनी मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडून पवारांना साथ दिली...तर 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर भुजबळांनी पवारांसोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तर त्याच भुजबळांनी 2023 मध्ये मात्र शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला

त्यानंतर सत्तेत असतानाही भुजबळांनी ओबीसी आरक्षणासाठी एल्गार पुकारला... पुढं त्याच भुजबळांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं.. त्यामुळं भुजबळ विरुद्ध अजित पवार संघर्षाच्या खमंग चर्चा रंगल्या.. आता भुजबळ मंत्रिमंडळात आहेत.. मात्र मंत्रिमंडळात असूनही भुजबळांचा विरोध डावलून मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला.. त्यामुळं भुजबळांसह ओबीसी नेते अस्वस्थ आहेत.. दरम्यान भुजबळांकडून गोपिनाथ मुंडेंनी मांडलेल्या ओबीसींच्या पक्षाचा मुद्दा छेडला जातोय.. त्यामुळे अस्वस्थ भुजबळ सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची मोट बांधून अजित पवार, फडणवीसांना धक्का देत नवा पक्ष स्थापन करणार का? यावर आगामी काळातील राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com