Manoj Jarange: मनोज जरांगे नावाचा माणूस बिनडोक, राज्यात विष पेरण्याचे काम केले; या नेत्याचा गंभीर आरोप|VIDEO

OBC Community Tension After Beed Rally: बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या मेळाव्यात भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

बीडमध्ये झालेला ओबीसी समाजाचा मेळावा ना भूतो न भविष्य असा होता. भुजबळ साहेब काल ही ओबीसींचे नेते होते आजही आहेत आणि उद्याही राहतील. कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे काल झालेल्या सभेमध्ये गैरहजर होते यावरूनच भुजबळांनी वडेट्टीवारांवर सडकून टीका केली होती. यावर हाके म्हणाले, आपल्यामध्ये असणारे हेवेदावे संवाद करून मिटून टाकूया आणि ओबीसी समाजाचा आरक्षण वाचवायाला हवे असं मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडलं आहे.

ओबीसी समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि रक्षण संपण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे असं हाके म्हणाले. ज्या मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रांमध्ये विष पेरलं त्याची काय फळं मिळणार. जरांगे नावाचा माणूस बिनडोक आहे. अशी सडकून टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com