Shocking : लग्नाला निघालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता, मोबाइल बंद; रस्त्याच्या कडेला आढळली कार, नेमकं काय घडलं?
Buldhana NewsSaam tv

Shocking : लग्नाला निघालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता, मोबाइल बंद; रस्त्याच्या कडेला आढळली कार, नेमकं काय घडलं?

Buldhana Crime News : तेलंगणाहून लग्न सोहळ्यासाठी निघालेलं जळगावातील पती-पत्नी रहस्यमयरित्या बेपत्ता झाले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मोबाईल लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेरजवळ आढळले. घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
Published on
Summary
  • लग्नाला जाणारे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता

  • शेवटचे लोकेशन वडनेर गावाजवळ पोलिसांना मिळाले

  • कुटुंबीयांनी घाबरून तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली

  • घातपाताचा प्राथमिक अंदाज

संजय जाधव, बुलढाणा

तेलंगणा राज्यातील लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारने निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत या दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेची सखोल चौकशी होत आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खाजगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत. पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या चार चाकी वाहनाने जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्याला जाण्यासाठी निघाले होते.

Shocking : लग्नाला निघालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता, मोबाइल बंद; रस्त्याच्या कडेला आढळली कार, नेमकं काय घडलं?
Accident : ४२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्लिपर बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ८ जण जखमी

मात्र ते लग्न सोहळ्याला पोचलेच नाही. शिवाय परत घरी देखील आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या काळजीने कुटुंबीयांनी शोध घेण्याचा आतोनात प्रयत्न केला. मात्र ते कुठे सापडलेच नाही. त्यांच शेवटच मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं.

Shocking : लग्नाला निघालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता, मोबाइल बंद; रस्त्याच्या कडेला आढळली कार, नेमकं काय घडलं?
Heavy Rain Alert : महाराष्ट्रावर पावसाचं सावट? मुंबई-पुण्यात तापमानाचा पारा घसरला; गुलाबी थंडी कधीपासून? वाचा हवामानाचा अंदाज

त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली आहे. यानुसार आता पोलिसांच पथक या दांपत्याच्या शोधासाठी निघालेल आहे. अचानक बेपत्ता झालेल्या दांपत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशय ही व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेची पायामुळं खणून काढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com